महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना

जमा करणार shahrukh on Thu, 02/05/2024 - 13:14
महाराष्ट्र CM
Scheme Open
हायलाइट्स
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनांतर्गत निवड झालेल्या अर्जदारांना खाली दिलेले फायदे मिळतात :-
    • ग्रेड - ए अधिकारी समतुल्य पद प्रदान केले जाईल.
    • मासिक वेतन रु ७०,०००/-प्रती महिना.
    • प्रवास आणि एटर खरच्यासाठी रु ५०००/ प्रती महिना स्वतंत्रपणे दिले जातील.
    • अपघाती विमा संरक्षण मिळेल.
    • आयआयटी मुंबई किंवा आयआयटी नागपूरचे विशेष शैक्षणिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र देण्यात येईल.
    • महाराष्ट्र सरकारकडून फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
    • फेलोशिपच्या कालावधीत 8 दिवसांची रजा मिळेल.
Customer Care
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना हेल्पलाईन नंबर :- ०८४११९६०००५.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना हेल्पडेस्क ईमेल :- cmfellowship-mah@gov.in.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना.
लॉंच केलेले वर्ष २०१५
फायदे
  • तरुणांना महाराष्ट्र सारकरसोबत काम करण्याची संधि मिळेल.
  • फेलोशिप दरम्यान रु ७०,०००/- स्टायपेंड प्रदान केले जातील.
  • रु ५०००/- प्रवास खर्च म्हणून दिले जातील.
  • ८ दिवसांची राज्य मिळेल.
  • फेलोशिप प्रमाणपत्र सुद्धा प्रदान केले जातील.
लाभार्थी महाराष्ट्रातील तरुण.
इंटर्नशिपचा कालावधी  १ वर्ष.
नोडल विभाग महाराष्ट्राचे अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालय आणि नियोजन विभाग.
सब्सक्रिप्शन .महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना अपडेट मिळविण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना ऑनलाइन अर्ज याद्वारे करू शकतो.

योजनेची माहिती

  • भारतात बेरोजगारीचे प्रमाण खूप जास्त आहे.
  • भारत सरकार तसेच राज्य सरकार बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.
  • महाराष्ट्र सरकारने तरुणांना अल्पकालीन रोजगार देऊन त्यांच्या कौशल्यांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
  • मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्रातील तरुणांच्या जीवनात मोठी भूमिका बजावत आहे.
  • ही योजना महाराष्ट्र सरकारने सन २०१५ मध्ये सुरू केली.
  • मुख्यमंत्री फेलोशिप योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे युवकांचे ज्ञान वाढवणे आणि त्यांना महाराष्ट्र सरकारसोबत जवळून काम करण्याची संधी देऊन त्यांच्या कौशल्य जोपासणे हा आहे.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनांतर्गत निवडक तरुणांना शासकीय विभागात १२ महिन्यांची फेलोशिप दिली जाईल.
  • फेलोशिपच्या कालावधीत फेलोंना ग्रेड - ए ऑफिसरच्या समान पद मिळेल.
  • त्याशिवाय निवडलेल्या फेलोना खाली नमूद केलेले फायदे आणि लाभ दिले जातील:-
    • प्रति महिना रु. ७०,०००/- स्टायपेंड.
    • प्रवास आणि इतर खर्चासाठी दारमहिन्याला अतिरिक्त ५,०००/-दिलेजातील.
    • १२ महिन्यांचे अपघाती विमा संरक्षण.
    • ८ दिवसांची प्रासंगिक रजा मिळेल.
    • आयआयआयटी नागपूर किंवा आयआयटी मुंबईकडून विशेष शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र.
    • महाराष्ट्र सरकारचे फेलोशिप प्रमाणपत्र.
  • एकदा अर्जदाराने फेलोशिप पूर्ण केली की, फेलोशिपचा अनुभव त्यांना इतर ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करताना इतर उमेदवारांवर वरचढ ठरेल.
  • तात्पुरत्या स्वरूपात फेलोंना अधिकृत ओळखपत्र आणि अधिकृत ईमेल आयडी देखील प्रदान केला जाईल.
  • अर्जदारासाठी १ वर्षाचा पूर्ण वेळेचा अनुभव अनिवार्य आहे.
  • मुख्यमंत्री फेलोशिप योजनांतर्गत पूर्णवेळ इंटर्नशिप, आर्टिकल शिप, अप्रेंटिसशिप मधले प्रोफेशनल कोर्स किंवा पूर्णवेळ स्वयंरोजगार आणि उद्योजकता हा अनुभव मानला जाईल.
  • अर्जदाराला मराठी भाषा अवगत असावी आणि तसेच वाचता, लिहिता आणि बोलता यावे.
  • इंग्रजी आणि हिंदीचे ज्ञानही आवश्यक आहे.
  • अर्जदाराची निवड महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनांतर्गत फेलोशिपसाठी ऑनलाइन परीक्षा, निबंध लेखन आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • पात्र अर्जदार ऑनलाईन अर्ज भरून मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अर्ज करू शकतात.

योजनेचे फायदे

  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनांतर्गत निवड झालेल्या अर्जदारांना खाली दिलेले फायदे मिळतात :-
    • ग्रेड - ए अधिकारी समतुल्य पद प्रदान केले जाईल.
    • मासिक वेतन रु ७०,०००/-प्रती महिना.
    • प्रवास आणि एटर खरच्यासाठी रु ५०००/ प्रती महिना स्वतंत्रपणे दिले जातील.
    • अपघाती विमा संरक्षण मिळेल.
    • आयआयटी मुंबई किंवा आयआयटी नागपूरचे विशेष शैक्षणिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र देण्यात येईल.
    • महाराष्ट्र सरकारकडून फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
    • फेलोशिपच्या कालावधीत 8 दिवसांची रजा मिळेल.

ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम आणि रचना

  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनांतर्गत फेलोची प्राथमिक निवड ऑनलाइन चाचणीवर आधारित असेल.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनेच्या ऑनलाईन परीक्षेची रचना पुढीलप्रमाणे आहे :-
    विषय प्रश्नांची संख्या
    सामान्य ज्ञान ५०
    तर्क १०
    इंग्रजी भाषा १०
    मराठी भाषा
    माहिती तंत्रज्ञान १०
    क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड १५
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे :-
    विषय अभ्यासक्रम
    सामान्य ज्ञान
    • चालू घडामोडी.
    • सामान्य ज्ञान.
    • सामाजिक प्रश्न.
    • भारत आणि महाराष्ट्राचे अर्थकारण.
    तर्क
      • तर्क क्षमता.
    इंग्रजी भाषा
    • वाक्य रचना
    • व्याकरण
    मराठी भाषा
    • व्याकरण.
    • रचना.
    माहिती तंत्रज्ञान
    • विंडोज ७.
    • एमएस ऑफिस २०१०.
    • इंटरनेट.
    क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड।
    • डेटा इंटरप्रिटेशन.
    • अंकगणित.
    • बीजगणित.
    • मूलभूत भूमिती.
  • ऑनलाइन चाचणी परीक्षेचे एकूण गुण १००आहेत.
  • ऑनलाइन परीक्षेत निवड झालेल्या अर्जदाराला हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेपैकी कोणत्याही एका भाषेत 3 निबंध लिहावे लागतील.
  • निबंधांच्या आधारे निवड झालेल्या अर्जदाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनेअंतर्गत फेलोशिपसाठी बोलावले जाईल.

पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय २१ वर्षे ते २६ वर्षादरम्यान असावे.
  • अर्जदाराल किमान १ वर्षाचा अनुभव असावा.
  • अर्जदार ६०% गुणांसह किमान पदवी उत्तीर्ण असावा.
  • अर्जदाराचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रभुत्व असावे.

आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :-
    • महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
    • दहावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
    • बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
    • गुणपत्रिका आणि पदवीची पदवी.
    • गुणपत्रिका आणि पदव्युत्तर पदवी. (असल्यास)
    • मार्कशीट आणि प्रोफेशनल कोर्सची पदवी. (असल्यास)
    • डिप्लोमा सर्टिफिकेट. (असल्यास)
    • अनुभव पत्र.
    • स्कॅन केलेले फोटोग्राफ आणि स्वाक्षरी.
    • मोबाईल नंबर.

अर्ज कसा करावा

  • पात्र अर्जदार ऑनलाईन अर्ज भरून शासकीय फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात.
  • ऑनलाइन अर्ज हा महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना पोर्टल यावर उपलब्ध आहे.
  • अर्जदाराला मूलभूत तपशील भरून प्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणीनंतर, पुढे जाण्यासाठी साइन इन वर क्लिक करा.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना ऑनलाइन अर्जामध्ये खालील तपशील क्रमवार भरा :-
    • वैयक्तिक माहिती.
    • संपर्क माहिती.
    • शैक्षणिक माहिती.
    • कामाच्या अनुभवाचे तपशील.
    • प्राधान्याची निवड.
  • मुख्यमंत्री फेलोशिप योजना ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतर अर्ज फी भरण्यासाठी पुढे जा.
  • रु ५००/- अर्ज फीज भरा.
  • पुढील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढावी.
  • प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा करावी.
  • फेलोशिपसाठी अर्जदाराची निवड ऑनलाइन प्रवेश परीक्षा, निबंध लेखन आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.

महत्वाच्या लिंक्स

संपर्काची माहिती

  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना हेल्पलाईन नंबर :- ०८४११९६०००५.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना हेल्पडेस्क ईमेल :- cmfellowship-mah@gov.in.

Comments

In reply to by अज्ञात (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Atharva vinod Hanmalwar
प्रतिक्रिया

Sir I have to apply for cm fellowship form.But still the form is not there . I request you the fo rm should be appeared on the online site. So many students will get benefit so I request you the form should be there and aspirants will go through the form.

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format