नमो ड्रोण दीदी योजना

जमा करणार shahrukh on Sat, 04/05/2024 - 16:15
केंद्र सरकार CM
Scheme Open
हायलाइट्स
  • ड्रोणच्या खरेदीवर महिला बचत गटातील महिलांना सबसिडी प्रदान करण्यात येईल.
  • ड्रोण किमतीच्या ८०% सबसिडी किंवा जास्तीत जास्त रु ८ लाख प्रदान केले जातील.
  • ड्रोणच्या उर्वरित किंमतीसाठी एआयएफ द्वारे कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
  • कर्जावर नाममात्र ३% व्याजदर देय असेल.
  • ड्रोण उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • महिला बचत गटाच्या महिला त्यांचे ड्रोण शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी भाड्याने वापरू शकतात.
  • बचत गटातील महिला ह्या अधिक रु. १ लाख कमाई दर वर्षी ड्रोणच्या मदतीने करू शकतात.
Customer Care
  • नमो ड्रोण दीदी योजनेबद्दल अधिक माहितीसाठी बचत गटाच्या लाभार्थी महिला सदस्य त्यांच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा किसान समृद्धी केंद्रात संपर्क साधू शकतात.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव नमो ड्रोण दीदी योजना.
लाँच तारीख ३०-११-२०२३
फायदे
  • ड्रोण उडवण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
  • ड्रोण खरेदी करण्यासाठी सबसिडी आणि कर्जाची सुविधा उपलब्ध.
लाभ महिला बचत गट.
सबसक्रीपशन योजनेच्या नियमित माहितीसाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत नमो ड्रोण दीदी योजनेच्या अर्जाद्वारे.

परिचय

  • नमो ड्रोण दीदी-योजना ही प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी ३० नोव्हेंबेर २०२३ ला विडियो कॉन्फ्रेंस द्वारे प्रक्षेपित केली.
  • ही योजना सुरू करण्यामागचे मुख्य उद्देश म्हणजे बचत गटामधील महिला सदस्यांना जास्त कमवण्यासाठी एक साधन व माध्यम उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनवणे.
  • ही योजना संपूर्ण देशात काही वेगळ्या नावानेही ओळखली जाते जसे “नमो ड्रोण दीदी योजना” किंवा “प्रधानमंत्री ड्रोण दीदी योजना” किंवा “पंतप्रधान ड्रोण दीदी योजना”.
  • नमो ड्रोण दीदी योजना ही महिला बचतगटाच्या महिलांची प्रगती वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये महिला बचत गटांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून दिले जाईल.
  • भारत सरकार नमो ड्रोण दीदी योजनेद्वारे महिला बचत गटांना अनुदानित किमतीत ड्रोण वाटप करेल.
  • ही ड्रोण महिला बचत गटाच्या सदस्यांना भाड्याने देण्यासाठी वापरता येतील.
  • ड्रोण भाड्याने देण्याची सेवा ही शेतकऱ्यांना देण्यात जेल ज्यात शेतकरी द्रोणच्या मदतीने कृषि विभागात किटाकणशके किंवा खतांची फवारणी केली जाईल.
  • यामुळे महिला बचत गटांना त्यांच्या सदस्यांसाठी अधिक कमवण्याची मदत होईल व शवटकऱ्यांचा ऑपरेशन कहा खर्चही कमी होईल आणि त्यामुळे कामाची क्षमता वाढेल.
  • ड्रोण खरचायच्या ८०% सबसीडी किंवा जास्तीत जास्त रु. ८,००,०००/- महिला बचत गटांना नमो ड्रोण दीदी योजनेअंतर्गत व्यावसायिक कारणाने ड्रोण खरेदी करण्यासाठी दिले जातील.
  • ड्रॉनचा उर्वरित खर्चभागवण्यासाठी नॅशनल अॅग्रिकल्चर इंडिया फायनान्सिंग फॅसिलिटी (एआयएफ) द्वारे महिला बचटगटासाठी कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
  • एआयएफ द्वारे कर्जावर दे व्याजदर प्रयत्तेक वर्ष ३% आहे.
  • सबसीडी रक्कम प्रदान करण्यापूर्वी बचत गटातील महिला सदस्यांना ड्रोण उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • नमो ड्रोण दीदी योजनेअंतर्गत ड्रोणच्या खरेदीवर सबसीडीचा लाभ घेण्यासाठी ड्रोण उडवण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे.
  • अंदाजा आहे की नमो ड्रोण दीदी योजनेच्या लाभार्थी रु. १,००,००० दर वर्षी नमो ड्रोण दीदी योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या ड्रोणच्या मदतीने अधिक कमाई मिळाऊ शकता
  • फक्त महिला बचत गट हेच नमो ड्रोण दीदी योजनेअंतर्गत ड्रोण खरेदीकरण्यासाठी दावा करू शकतात.
  • लाभार्थी महिला त्यांच्या जवळच्या ग्राम पंचायत कार्यालय किंवा प्रधान मंत्री किसम समृद्धी केंद्रात अर्ज प्रक्रियेबद्दल किंवा नमो ड्रोण दीदी योजनेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधू शकतात.

योजनेचे फायदे

  • नमो ड्रोण योजनेअंतर्गत महिला बचत गटांना भारत सरकार खाली दिलेले फायदे प्रदान करेल :-
    • ड्रोणच्या खरेदीवर महिला बचत गटातील महिलांना सबसिडी प्रदान करण्यात येईल.
    • ड्रोण किमतीच्या ८०% सबसिडी किंवा जास्तीत जास्त रु ८ लाख प्रदान केले जातील.
    • ड्रोणच्या उर्वरित किंमतीसाठी एआयएफ द्वारे कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
    • कर्जावर नाममात्र ३% व्याजदर देय असेल.
    • ड्रोण उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
    • महिला बचत गटाच्या महिला त्यांचे ड्रोण शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी भाड्याने वापरू शकतात.
    • बचत गटातील महिला ह्या अधिक रु. १ लाख कमाई दर वर्षी ड्रोणच्या मदतीने करू शकतात.

पात्रता निकष

  • नमो ड्रोण दीदी योजनेअंतर्गत ड्रोण घेण्यासाठी सबसिडी व कर्ज त्याच लाभार्थ्यानां प्रदान केलेजाईल जे खाली दिलेल्या अटी पूर्ण करतील :-
    • फक्त महिला बचत गटच अर्ज करण्यास पात्र.
    • ड्रोण फक्त कृषि विषयक उपक्रमासाठी भाड्याने वापरता येईल.

आवश्यक कागदपत्रे

  • भारत सरकारच्या नमो ड्रोण दीदी योजनेअंतर्गत द्रोणे खरेदीसाठी सबसीडी व कर्जाचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :-
    • महिला बचत गट नोंदणी क्रमांक.
    • महिला सदस्य आधार कार्ड.
    • महीला बचत गटाच्या बँक खात्याची माहिती.
    • मोबाईल नंबर.

अर्ज कसा करावा

  • शशनाने स्थापन केलेल्या जिल्हा समिती नमो ड्रोण दीदी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला बचत गटांची निवड करेल.
  • नमो ड्रोण दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त नोंदणी केलेले महिला बचत गटच पात्र राहतील.
  • जिल्हा समिति महिला बचत गटांची निवड ही थांच्या आर्थिक स्थितिवर आधारित आणि त्यांच्या समाजातील कामाच्या आधारे करेल.
  • निवडलेल्या महिला बचत गटांची यादी ही जिल्हा समितीद्वारे केली जाणार आणि तसेच बचत गटांच्या प्रमुखाला निवडीची माहिती देण्यात येणार.
  • नमो ड्रोण दीदी योजनेअंतर्गत निवडलेल्या महिला बचत गटांनमधील सर्व महिला सदस्यांना ड्रोण कसे उडवायचे व इतर तांत्रिक गोष्टीचे प्रशिक्षण दिले जाणार.
  • नमो ड्रोण योजनेमद्धे ड्रोण खरेदीसाठी सबसिडी व कर्ज प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरच दिले जाणार.
  • महिला बचत गट त्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी ड्रोण भाड्याने देऊन त्यांच्या कुटुंबासाठी अधिक उदरनिर्वाह्याची मदत करू शकतात.
  • नमो ड्रोण दीदी योजनेअंतर्गत अधिक मदत मिळवण्यासाठी लाभार्थी महिला जवळच्या प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र किंवा ग्राम पंचायत कार्यालयात संपर्क करू शकतात.

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

  • नमो ड्रोण दीदी योजनेबद्दल अधिक माहितीसाठी बचत गटाच्या लाभार्थी महिला सदस्य त्यांच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा किसान समृद्धी केंद्रात संपर्क साधू शकतात.

Comments

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format