महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना

जमा करणार shahrukh on Fri, 12/07/2024 - 16:49
महाराष्ट्र CM
Scheme Open
Maharashtra Mukhyamantri Yuva Karyaprashikshan Yojana Budget Info
हायलाइट्स
  • नोकरीवर प्रशिक्षण दिले जाईल.
  • रु. १०,०००/- प्रती महिना देखील प्रदान केले जाईल.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना.
लॉंच वर्ष २०२४
फायदे नोकरी प्रशिक्षणावर मासिक रु. १०,०००/- स्टायपेंडसह.
लाभार्थी महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण.
नोडल विभाग क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र.
सबसक्रीपशन महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेबद्दल उपडेट मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अर्जाद्वारे.

परिचय

  • सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दरवर्षी ११ लाखांहून अधिक विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण होतात.
  • काहींना नोकरी मिळू शकते तर काही विद्यार्थ्यांना योग्य नोकरी मिळू शकत नाही.
  • त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने एक नवीन योजना लवकरच सुरू होणार आहे.
  • “मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना” असे या योजनेचे नाव आहे.
  • याची घोषणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प पुरवणी सादर करतांना केली.
  • महाराष्ट्र सरकार आता मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व पात्र तरुणांना नोकरीचे प्रशिक्षण देणार आहे.
  • औद्योगिक आणि विना औद्योगिक आस्थापनांनमध्ये नोकरीवर प्रशिक्षण दिले जाईल.
  • मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना उद्योगांमधील मनुष्यबळाची गरज पूर्ण करेल आणि गरजू लोकांना रोजगरची संधीही उपलब्ध करून देईल.
  • ऑन जॉब ट्रेनिंग व्यतिरिक्त महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत निवडक युवकांना रु १०,०००/- प्रतीमहिना स्टायपेंड देखील प्रदान केले जाईल.
  • या योजनेच्या सुरक्षित अमलबाजवणीसाठी शासनाने १०,०००/- कोटी रुपयांचे बजेट आकरले.
  • महाराष्ट्रातील सुमारे १०,००,००० तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीचे प्रशिक्षण मिळेल असा अंदाज आहे.
  • सध्या या योजनेबद्दल एवढीच माहिती उपलब्ध आहे.
  • मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया स्पष्ट होईल.
  • आम्हाला योजनेबद्दल कोणतेही अपडेट मिळताच आम्ही पेज उपडेट करू.

योजनेचे फायदे

  • महाराष्ट्र शशनच्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ खालीलप्रमाणे आहेत :-
    • नोकरीवर प्रशिक्षण दिले जाईल.
    • रु. १०,०००/- प्रती महिना देखील प्रदान केले जाईल.

पात्रता निकष

  • मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीचे प्रशिक्षण आणि स्टायपेंड फक्त अश्या तरूणांनाच दिले जाईल जे खालील पात्रता निकष पूर्ण करतात :-
    • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
    • अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा जास्त असावे.
    • अर्जदार ग्रॅजुएट, पोस्ट ग्रॅजुएट किंवा डिप्लोमा धारक असावा.
    • उर्वरित पात्रता निकष लवकरच जाहीर जेले जातील.

आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरीच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :-
    • महाराष्ट्र निवासी पुरावा.
    • आधार कार्ड.
    • शैक्षणिक कागदपत्रे.
    • मोबाइल नंबर.
    • पासपोर्ट साइज फोटो.
    • उत्पन्न दाखला.

अर्ज कसा करावा

  • महाराष्ट्र सरकार २८ जून २०२४ रोजी अर्थसंकल्प पुरवणी सादर करात आहे.
  • महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपूख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी युवकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर केली.
  • सांभानधित विभाग मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे काम करेल.
  • मार्गदर्शक तत्वे तयार झाल्यानंतर कॅबिनेट त्याला मंजूरी देईल.
  • अर्जाची प्रक्रिया मार्गदर्शक तत्त्वांमध्ये परिभाषित केली जाईल.
  • मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेचा अर्ज ऑनलाइन अर्जाद्वारे स्वीकारायचा की ऑफलाइन अर्जाद्वारे स्वीकारेचा याचा निर्णय विभाग घेईल.
  • जर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन अर्जाद्वारे असेल तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना देखील सुरू होईल.
  • त्यामुळे, लाभार्थी युवकांना मुख्य मंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
  • आम्हाला कोणतीही माहिती मिळताच आम्ही पेज अपडेट करू.

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

?

Comments

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format