महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना

जमा करणार shahrukh on Thu, 02/05/2024 - 13:14
महाराष्ट्र CM
Scheme Open
हायलाइट्स
  • विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि धनगर समाजाला 50,000 बांधलेली घरे दिली जातील.
  • बांधलेली घरे खालील प्रमाणे समाजामध्ये वितरित केले जाईल :-
    कॅटेगरी घरांची संख्या.
    विमुक्त जाती आणि भटक्या जमाती 25,000 घरे.
    धनगर समाज २५,००० घरे
  • बांधलेल्या घराचे क्षेत्रफळ ही २६९ चौरस फूट असेल.
  • घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन असलेल्या वैयक्तिक लाभार्थ्यांना सरकार खाली दिलेली आर्थिक मदत देखील करते :-
    • डोंगराळ भागात राहणाऱ्या लाभार्थ्यांना रु. 1,30,000/-.
    • सर्वसाधारण क्षेत्रात राहणाऱ्या लाभार्थ्यांना रु. 1,20,000/-.
Customer Care
  • महाराष्ट्र विभाग, योजना, कार्यक्रम संबंधित प्रश्न टोल फ्री क्रमांक :- १८००१२०८०४०.
  • महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
    • ०२२-२२८२३८२१.
    • ०२२-२२८२३८२०.
  • महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग हेल्पडेस्क ईमेल :- jdvjnt@maharashtra.gov.in.
  • महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष मदत विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
    • ०२२-२२०२५२५१.
    • ०२२-२२०२८६६०.
  • महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष मदत विभाग हेल्पडेस्क ईमेल :- min.socjustice@maharashtra.gov.in.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना.
फायदे
  • मोफत मध्ये बांधलेली घरे दिली जातील.
  • ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे त्यांना आर्थिक मदत मिळेल.
लाभार्थी
  • विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (व्हिजेएनटी).
  • धनगर समाज.
नोडल विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र.
सब्स्क्रिप्शन योजनेबद्दल माहिती मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज कश्याद्वारे करावा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ऑफलाइन अर्जाच्या माध्यमातून.

योजनेची माहिती

  • महाराष्ट्रात बऱ्याच लोकांकडे त्यांची स्वतःची घरे नाहीत.
  • ते झोपडपट्टीत, तंबूमध्ये, किंवा तात्पुरत्या कच्या घरात राहतात.
  • त्यापैकी काही लोकांनकडे घरबंधण्यासाठी स्वतःची जमीन आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे ते घर बंधु शकत नाही.
  • अश्या लोकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.
  • ही योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे लोकांचे राहणीमान सुधारणे आहे,त्यांना चांगले बांधलेले घर देने व घरबांधण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे.
  • इतर मागासबहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन हा ह्या योजनेचा नोडल विभाग आहे.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही राज्यात काही दुसऱ्या नावानेही ओळखली जाते ते :-
    • "यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना."
    • "यशवंतराव चव्हाण मोफत वसाहत योजना".
  • सन 2023-2024 च्या अर्थसंकल्पीय घोषणेत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी 600/- कोटी रुपयांचे अंदाजपत्रक जाहीर केले.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत , महाराष्ट्र शासन सर्व पात्र असलेल्या लोकांना 50,000 बांधलेले घर देईल.
  • ह्या बांधलेल्या 50,000 घरांपैकी 25,000 घरे ही विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना आणि बाकी 25,000 बांधलेली घरे धनगर समाजातील लोकांना दिली जाणार आहेत.
  • वसाहती ह्या २० कुटुंबे/ २० घरे अश्या समूहासह बांधल्या जातील.
  • बांधलेल्या घरांव्यतिरिक्त, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत नव्याने बांधलेल्या वसाहतींमध्ये पुढील सुविधाही प्राप्त होतील :-
    • अंतर्गत रस्ते.
    • ड्रेनेज.
    • पाणी पुरवठा.
    • वीज पुरवठा.
    • कम्युनिटी हॉल. (समाज मंदिर)).
  • ज्या लोकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 1,20,000/-प्रती वर्ष पेक्षा जास्त आहे अशी लोक यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत स्वतची जमीन असलेल्या वैयक्तिक लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल.
  • रु. 1,30,000/- डोंगराळ भागात आणि रु. 1,20,000/- साधारण क्षेत्रामध्ये, लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत म्हणून दिले जाईल.
  • पात्र असलेले लाभार्थी महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी सहाय्यक आयुक्त कार्यालयात उपलब्ध असलेल्या ऑफलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.

फायदे

  • महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमार्फत सर्व पात्र असलेल्या लाभार्थ्यांना खालील फायदे दिले जातील :-
    • विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि धनगर समाजाला 50,000 बांधलेली घरे दिली जातील.
    • बांधलेली घरे खालील प्रमाणे समाजामध्ये वितरित केले जाईल :-
      कॅटेगरी घरांची संख्या.
      विमुक्त जाती आणि भटक्या जमाती 25,000 घरे.
      धनगर समाज २५,००० घरे
    • बांधलेल्या घराचे क्षेत्रफळ ही २६९ चौरस फूट असेल.
    • घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन असलेल्या वैयक्तिक लाभार्थ्यांना सरकार खाली दिलेली आर्थिक मदत देखील करते :-
      • डोंगराळ भागात राहणाऱ्या लाभार्थ्यांना रु. 1,30,000/-.
      • सर्वसाधारण क्षेत्रात राहणाऱ्या लाभार्थ्यांना रु. 1,20,000/-.
Maharashtra Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana Benefits

पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमच रहिवासी असावा.
  • अर्जदार हा बेघर असावा त्याचे स्वतःचे घर नसावे.
  • अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1,20,000/- पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार हा खाली दिलेल्या कोणत्याही कॅटेगरीपैकी असावा :-
    • विमुक्त जाती आणि भटक्या जमाती
    • धनगर समाज
  • अर्जदार हा त्याच्या/तिच्या कुटुंबासह तंबू, झोपडी किंवा कच्चा घरात राहत असावा.
  • अर्जदार हा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभार्थी नसावा.

आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा अर्ज भरण्यासाठी खाली दिलेली कागदपत्रे गरजेचे आहेत :-
    • निवासाचा पुरावा/ अधिवास प्रमाणपत्र.
    • बँक खाते माहिती.
    • जातीचे प्रमाणपत्र.
    • उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
    • आधार कार्ड.
    • अक्षम प्रमाणपत्र. (अपंग व्यक्तीसाठी)
    •  पतीचा मृत्यू प्रमाणपत्र. (विधवा महिलांसाठी)
    • पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र. (विधुर पुरुषांसाठी)
    • पालक मृत्यू प्रमाणपत्र. (अनाथांसाठी)
    • पासपोर्ट साइज फोटो.
    • मोबाईल नंबर.

अर्ज कसा करावा

  • लाभार्थी महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा ऑफलाइन अर्ज भरून लाभ घेऊ शकतात.
  • महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा ऑफलाइन अर्ज विनामूल्य, संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात उपलब्ध असेल.
  • अर्ज घ्या आणि तो काळजीपूर्वक भरा.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडा.
  • त्याच जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा अर्ज जमा करा.
  • मिळालेल्या अर्जासह कागदपत्रांची तपासणी ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाईल.
  • तपासणीनंतर, निवडलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल आणि लाभार्थींना त्यांच्या मोबाईल फोनवर एसएमएस किंवा ईमेलद्वारे सूचित केले जाईल.
  • निवडलेल्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत बांधलेले घर किंवा घर बांधण्यासाठी मोफत मदत मिळेल.

महत्वाच्या लिंक्स

संपर्काची माहिती

  • महाराष्ट्र विभाग, योजना, कार्यक्रम संबंधित प्रश्न टोल फ्री क्रमांक :- १८००१२०८०४०.
  • महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
    • ०२२-२२८२३८२१.
    • ०२२-२२८२३८२०.
  • महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग हेल्पडेस्क ईमेल :- jdvjnt@maharashtra.gov.in.
  • महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष मदत विभाग हेल्पलाइन क्रमांक :-
    • ०२२-२२०२५२५१.
    • ०२२-२२०२८६६०.
  • महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष मदत विभाग हेल्पडेस्क ईमेल :- min.socjustice@maharashtra.gov.in.
  • महाराष्ट्र इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र,
    पहिला मजला, ॲनेक्स बिल्डिंग, मंत्रालय,
    मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
    नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००३२.

Comments

Permalink

प्रतिक्रिया

i have land i want to construct how do i apply financial assistance

Permalink

Your Name
Sanjay bhau Wanave
प्रतिक्रिया

Please give me a best house

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format