अलीगढ मुस्लिम विद्यापीठ नागरी सेवांसाठी मोफत कोचिंग योजना

जमा करणार shahrukh on Mon, 05/08/2024 - 16:10
केंद्र सरकार CM
Scheme Open
हायलाइट्स
  • प्री आणि मैन्ससाठी मोफत पकोचिंग क्लासेस.
  • सीएसएटी.
  • निवडक पर्यायी पेपर.
  • चाचणी सराव.
  • उत्तराचे मूल्यमापन.
  • निबंध लेखन सराव.
  • वसतिगृह सुविधा.
  • १७ तास उघडी राहील अशी वातानुकूलित ग्रंथालय (सकाळी ८:०० ते सकाळी १:०० पर्यन्त).
Customer Care
  • कोचिंग संबंधीत प्रश्नांसाठी :-
    • ७०१७०३५७३१.
    • ८७९१४३१७८०.
  • हेल्प डेस्क ईमेल :- directorrcaamu@gmail.com.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव अलीगढ मुस्लिम विद्यापीठ नागरी सेवांसाठी मोफत कोचिंग योजना.
जागांची संख्या १००.
फायदे नागरी सेवा परीक्षेसाठी मोफत कोचिंग क्लासेस.
पात्र विद्यार्थी
  • महिला.
  • अनुसूचित जाती.
  • अनुसूचित जमाती.
  • अल्पसंख्यांक.
उद्दिष्ट
  • आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे कोचिंग देणे.
  • त्यांना नागरी सेवा परीक्षेसाठी तयार करणे.
  • विद्यार्थ्यांचे स्वर कौशल्य सुधारणे.
  • अभ्यास साहित्य आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देणे.
अर्ज फी रु. ७००/-
नोडल एजन्सी अलीगढ मुस्लिम विद्यापीठ.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन अर्ज फॉर्म.

परिचय

  • अलिगढ मुस्लिम विद्यापीठ हे उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे स्थित एक प्रसिद्ध केंद्रीय विद्यापीठ आहे.
  • दरवर्षी अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारसी (झोरोस्टेरियन) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला विद्यार्थ्यांना या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना विनामूल्य कोचिंग प्रदान करते.
  • आर्थिकदृष्टया दुर्बल विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि त्यांना भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजेच नागरी सेवा परीक्षेसाठी तयार करणे हा मुख्य उद्देश आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगा या मार्फत दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते.
  • दरवर्षी लाखों विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात.
  • तयारीसाठी विद्यार्थी लाखों रुपये फी म्हणून कोचिंग संस्थांना देतात.
  • परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना नागरी सेवा परीक्षेत भाग घ्यायचा आहे,परंतु पैशांअभावी ते तयारी करू शकत नाहीत.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्याना मदत करण्यासाठी अलिगढ मुस्लिम विद्यापीठ याकडून नागरी सेवांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते.
  • या कोचिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
  • केंद्रीय लोकसेवा आयोग च्या मॉडेलच्या आधारे प्रवेश परीक्षा घेतली जाते.
  • ही प्रवेश परीक्षा अखिल भारतीय स्थरावर अलिगढ मुस्लिम विद्यापीठ याद्वारे घेतली जाते.
  • भारतभरात ९ केंद्रे आहेत जिथे प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.
  • कार्यक्रमासाठी कोणतेही कोचिंग शुल्क नाही.
  • एकदा निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी कोचिंग दिले जाते.

कोचिंग अभ्यासक्रम

  • अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या मोफत नागरी सेवा कोचिंग प्रोग्राममध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना खाली नमूद केलेल्या सुविधा मिळतील :-
    • प्री आणि मैन्ससाठी मोफत पकोचिंग क्लासेस.
    • सीएसएटी.
    • निवडक पर्यायी पेपर.
    • चाचणी सराव.
    • उत्तराचे मूल्यमापन.
    • निबंध लेखन सराव.
    • वसतिगृह सुविधा.
    • १७ तास उघडी राहील अशी वातानुकूलित ग्रंथालय (सकाळी ८:०० ते सकाळी १:०० पर्यन्त).

वर्ष २०२४-२०२५ साठी कोचिंग कार्यक्रमाचे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज सुरू १३-०७-२०२४.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १४-०८-२०२४.
लेखी परीक्षेची तारीख ०१-०९-२०२४. (सकाळी १०:०० ते दुपारी ०१:००)
लेखी परीक्षेची वेळ
  • सामान्य अभ्यास (ऑब्जेकटिव टाइप) :- सकाळी १०:०० ते सकाळी ११:००.
  • निबंध :- सकाळी ११:०० ते दुपारी १:००.

पात्रता

  • फक्त टेक उमेदवार ज्यांनी आधीच पदवी पूर्ण केली आहे.
  • महिला विद्यार्थिनी.
  • अनुसूचित जातीचे विद्यार्थी.
  • अनुसूचित जमातीचे विद्यार्थी.
  • आणि जे विद्यार्थी सहा अधिसूचित अल्पसंख्यांक समुदायातील आहेत :-
    • मुस्लिम.
    • बौद्ध.
    • शीख.
    • ख्रिश्चन.
    • पारशी (झोरोस्ट्रियन).
    • जैन.

आवश्यक कागदपत्रे

  • ईमेल आयडी.
  • मोबाइल नंबर.
  • स्कॅन केलेला फोटो.
  • स्कॅन केलेली सह.
  • अर्जाची फी भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा एटीएम-कम-डेबिट कार्ड.

प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम

  • एएमयू आरसीए नागरी सेवा प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रवेश परीक्षा दोन पेपर्समध्ये विभागली आहे.
  • पेपर १ मध्ये ओएमआर वर आधारित ऑब्जेकटिव प्रश्न असतात.
  • पेपर १ मध्ये १०० प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न २ गुणांचा असेल.
  • पेपर १ चा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे :-
    • सामान्य जागरूकता.
    • लॉजिकल थिंकिंग.
    • तर्क.
    • आकलन.
  • पेपर २ मध्ये निबंध लेखन असते.
  • पेपर २ साठी एकूण २०० गुण  असतील.
  • उमेदवारांना २ निबंध लिहावे लागतील.
  • दोन्ही निबंधांना प्रत्येकी १०० गुण आहेत.
  • परीक्षेसाठी एकूण ३ तासांचा वेळ देण्यात आला आहे.
  • ओएमआर वर आधारित ऑब्जेकटिव प्रकारच्या प्रश्नपत्रिकेसाठी म्हणजेच पेपर १ साठी १ तास आह.
  • आणि २ तास हे निबंध लेखनासाठी म्हणजेच पेपर २ साठी.
  • त्यानंतर यशस्वी उमेदवार १०० गुणांची असलेली मुलाखत देतील.

अर्ज कसं करावा

  • अर्ज करण्याचा एकमेव मार्ग हा ऑनलाइन अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे आहे.
  • उमेदवाराने पहिले स्वतःची नोंदणी करावी.
  • नोंदणी फॉर्ममध्ये खाली दिलेली आवश्यक माहिती भरा :-
    • उमेदवाराचे पूर्ण नाव.
    • जन्म दिनांक.
    • लिंग.
    • वडिलांचे नाव.
    • आईचे ना.
    • ईमेल आयडी.
    • तुमचा पासवर्ड तयार करा. 
    • पासवर्ड कन्फर्म करा.
    • अर्जदारचा मोबाइल नंबर.
    • कॅप्चा भरा.
    • साइन उप वर क्लिक केल्यानंतर उमेदवाराची नोंदणी होईल.
  • त्यानंतर, तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्डसह पोर्टलवर लॉगइन करा.
  • विचारलेली सर्व माहिती भरा.
  • पेमेंट करा आणि त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल.
  • त्यानंतर प्रवेशपात्राची प्रतीक्षा करा.

योजनेचे वैशिष्ट्ये

  • या कार्यक्रमात प्रवेश निश्चित करण्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाईल.
  • प्रवेश फक्त गुणवत्तेच्या आधारावरच दिला जाईल.
  • प्रवेश परीक्षेत दोन पेपर असतील.
  • लेखी परीक्षा इंग्रजी, हिन्दी, आणि उर्दू भाषेत असेल.
  • चाचणी परीक्षा ३ तासांची असेल.
  • ऑब्जेकटिव प्रकारच्या प्रश्नांसाठी म्हणजेच पेपर १ साठी निगेटीव्ह मार्किंग राहील.
  • चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.
  • पेपर १ ऑब्जेकटिव प्रकारचा आहे आणि त्यात सामान्य जागरूकता, लॉजिकल थिंकिंग, तर्क आणि आकलन यांचा समावेश आहे.
  • पेपर २ मध्ये निबंध लेखन असेल.
  • दोन्ही पेपर मिळून परीक्षेचे एकूण गुण ४०० आहेत.
  • टाय झाल्यास, मुलाखातीमद्धे जास्त गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
  • तरीही टाय झाल्यास, लहान विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाईल.
  • ज्या उमेदवारांचे आधीच ग्रॅजुएशन पूर्ण झाले आहे आणि नागरी सेवा २०२४ मध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत त्यांनीच निवासी कोचिंग अकॅडमी, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे.
  • निवासी कोचिंग अकॅडमी नागरी सेवा २०२४ मध्ये व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र असलेल्यांसाठी मॉक इंटरव्ह्यु देखील घेन्यात येतील.
  • चाचणी मालिका (पर्वपरीक्षेसाठी) वेळोवेळी घेतल्या जातील.
  • चाचणी मालिका (मेन्स परीक्षेसाठी) वेळोवेळी घेतल्या जातील.
  • विद्यार्थ्यांना २४*७ वातानुकूलित असलेल्या ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
  • प्रवेश घेतलेल्या मर्यादित संखेत विद्यार्थ्यांची वसतिगृहात राहण्याची सोय केली जाईल.
  • नोंदणी फी ही रु. ५००/- (प्रवेश घेण्याच्या वेळी भरावी लागेल) आणि परत करण्यायोग्य सावधगिरी/ सुरक्षा रक्कम ही एएमयू  च्या विद्यार्थ्यांसाठी रु. १,०००/- असेल व जे एएमयू नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी रु. २,५००/-, असे विद्यार्थ्यांकडून घेतले जातील.
  • अर्ज ऑनलाइन करावा लागेल आणि त्यासाठी रु. ७००/- किंवा+ लागू असलेला मूलभूत शुल्क लागेल.
  • परीक्षेची तारीख तात्पुरती आहे आणि अनपेक्षित परिस्थितीमुळे ती बदलू शकते.

विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क

  • एएमयू आरसीए मधील नागरी सेवा परीक्षेसाठी कोचिंगसाठी विद्यार्थ्यांनी दिलेले शुल्क खालील प्रमाणे आहेत :-
    शुल्क रक्कम
    अर्ज फी
    (जी अर्ज करतांना भरावी लागेल)
    रु. ७००/-
    नोंदणी फी
    (जी प्रवेश घेतांना भरावी लागेल)
    रु. ५००/-
    सावधीचे पैसे
    (एएमयू च्या विद्यार्थ्यांसाठी)
    (परतावायोग्य)
    रु. १०००/-
    सावधीचे पैसे
    (एएमयू नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी)
    (परतावायोग्य)
    रु. २५००/-
    कोचिंग फी कोचिंग फी नसेल

परीक्षा केंद्रांची यादी

  • अलीगढ मुस्लिम विद्यापीठ निवासी कोचिंग अकॅडमी नागरी सेवेची फ्री कोचिंगसाठीची प्रवेश परीक्षा खाली नमूद केलेल्या शहरांमध्ये घेण्यात येईल :-
    • अलीगढ, उत्तर प्रदेश.
    • लखनौ, उत्तर प्रदेश.
    • श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर.
    • पटना,बिहार.
    • मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल.
    • नवी दिल्ली.
    • मलप्पुरम (केरळ).
    • हैदराबाद, तेलंगणा.
    • कोलकाता, पश्चिम बंगाल.

    किमान १०० अर्ज प्राप्त झाल्यावरच अलीगढच्या बाहेरील केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

  • कोचिंग संबंधीत प्रश्नांसाठी :-
    • ७०१७०३५७३१.
    • ८७९१४३१७८०.
  • हेल्प डेस्क ईमेल :- directorrcaamu@gmail.com.
  • पत्ता :- अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ, उत्तर प्रदेश.
    २०२००२.

Comments

Permalink

प्रतिक्रिया

exam date is 14th of august for the left out candidates who had not given the exam due to CAPF exam on the same day.

Permalink

प्रतिक्रिया

this time i am not able to crack this RCA AMU Exam. is there a second list or reserved list?

Permalink

Your Name
Mohd Anas
प्रतिक्रिया

Plz support me on upsc prepare

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format